‘त्या’ अल्पवयीन मुलांचे उपोषण सुरूच

0
20

मोहाडी, दि.२३ : सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या अल्पवयीन दोन मुलांचे दहा दिवसापासून साखळी उपोषण सुरूच आहे. अजूनही प्रशासनाने कोणताच तोडगा काढलेला नाही. शिवलाल लिल्हारे यांचे महसूल प्रशासनाने घर पाडल्यानंतर लिल्हारे दाम्पत्य बेघर झाले. हक्काचा निवारा मिळावा यासाठी शिवलालची सतीश व समीर ही किशोरवयीन मुले मोहाडी तहसील कार्यालयासमोर दहा दिवसापासून साखळी उपोषणावर बसली आहेत. तहसीलदार यांनी पाडलेल्या घराचा पट्टा देण्यासाठी जाहीरनामा काढला होता. त्याची मुदत संपली. त्यानंतर गावातील काही आक्षेप आले. त्यामुळे त्या जागेचा पट्टा शिवलाल लिल्हारे यांना मिळणार काय? या विषयी साक्षंकता निर्माण झाली आहे. सिरसोलीच्या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. त्यामुळे सत्ता पक्ष सोडून सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची धावपळ चालली आहे.