ऊर्जामंत्री बावनकुळें ओबीसींच्या प्रश्नावर उत्तर द्यायला विसरले

0
25

नागपूर,दि.23ः-जिल्ह्यातील मौदा येथे 23 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या जनता दरबारात ओबीसी समाजातील प्रश्नावर काही ओबीसी युवकांनी हजेरी लावत उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ओबीसी-मराठा आरक्षणासंदर्भात तसेच ओबीसींच्या इतर प्रश्नावर निवेदन देत चर्चा केली.त्यावेळी बावनकुळे यांनी राज्याचे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री यांच्यासोबत बैठक लावून आरक्षण व इतर विषयासंदर्भात चर्चा करुन देण्याच्या आश्वासनाला वर्ष लोटायला येत असतानाही बावनकुळेंना मात्र दिलेले आश्वासन विसरल्याचा आरोप ओबीसी विद्यार्थी राम वाडीभस्मे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे बावनकुळे यांच्याकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.मंत्र्याचे स्वीय सहाय्यक दिनेश भोयर यांच्याकडून यासंदर्भात माहिती घेण्यात आली,त्यावेळी त्यांनीही वेगवेगळी उत्तर देत मुख्य विषयावरील चर्चा टाळण्याचाच प्रयत्न केला.लोकसभेची निवडणुक आटोपली आता विधानसभेची निवडणूक येऊ घातली असताना मात्र ओबीसी-मराठा आरक्षणावर बावनकुळे खरी भूमिका का जाहिर करीत नाही अशा प्रश्न करीत येत्या १५ दिवसाच्या आत मंत्र्यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेत कळवावे अन्यथा आम्ही ओबीसी प्रवर्गाची दिशाभूल केल्याबद्दल सर्व ओबीसी युवक  निषेध नोंदवणार असल्याचा ईशारा वाडीभस्मे यांनी पत्रकातून दिला आहे.