कृषी केंद्र संचालकांना बजावली नोटीस

0
29

सडक अर्जुनी,दि.२३ : तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालकांनी बियाणांवर सूट देण्याच्या नावाखाली कूपन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने याची नोंद घेवून सदर कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. नोटीसचे उत्तर दिल्यानंतर परवाना रद्द करण्याची कारवाही करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.दिलीप गायकवाड, परसराम राऊत, गोपी भोयर, राजाराम झिंगरे, यशवंत गायकवाड, भाऊराव शेंडे, प्रल्हाद गायकवाड, सुभाष बागडे, छगनलाल खोब्रागडे या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली होती.कृषी विभागाच्या भरारी पथकाने सडक अर्जुनी येथील दोन कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. हीच बाब हेरुन विविध बियाणे कंपन्या सुध्दा खरीप हंगामाच्या तोंडावर सक्रीय झाल्या आहेत. खरीपासाठी शेतकऱ्यांना लागणाºया धानाच्या बियाणांची गरज लक्षात घेवून वर्धा येथील यशोदा सिड्स कंपनीच्या एजंटनी तालुक्यातील अनेक शेतकºयांकडून यशोदा १३१२, अहिल्या, हरिमाऊली, अंबिका, चायना राईस, आर.एच.१० या प्रजातीच्या धानाची बुंकीग करुन घेतली. ज्या शेतकऱ्यांनी या धानाची बुंकीग केली त्या शेतकऱ्यांना धानाच्या प्रती बॅगवर १५० रुपयांची सूट मिळेल यासंबंधिचे एक कूपन दिले होते. शिवाय हे कूपन ज्या कृषी केंद्रातून शेतकरी धानाची खरेदी करतील त्या दुकानातून त्यांना सूट दिली जाईल असे सांगितले होते. या कंपनीच्या एजंटनी सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना कुपनचे वितरण करुन बियाणांचे बुकींग करुन घेतले. शेतकऱ्यांनी सुध्दा बियाणे खरेदी करताना आपले चारपाचशे रुपये वाचतील या आशेने धानाची बुकींग करुन घेतली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी हे कुपन घेवून कृषी केंद्रात धानाचे बुकींग करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना सदर दुकानदार या कंपनीचे बियाणे घेतल्यानंतर सुध्दा कुठलीच सूट देत दिली नाही.