चुरडी,गराडा,चिखली व भिवापुर गावातील नागरीकांचा स्वच्छाग्रह उपक्रमात सहभाग

0
17

तिरोडा,दि.24ः- तालुक्याती चुरडी,गराडा,चिखली व भिवापुर गावामध्ये स्वच्छतेविषय जनजागृती अभियानंतर्गंत अदानी फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छाग्रह उपक्रम राबविण्यात आले.हे उपक्रम अदानी पावर प्रमुख सी.पी.साहु व आँपरेशन अँन्ड मेन्टनन्स हेड अरिन्दम चटर्जी याच्यां मार्गदर्शनाखाली तसेच अदानी पावरचे अधिकारी चन्द्रेश शुक्ला,परबिर शहा,अशाेक कुमार मिश्रा व हरीप्रसाद अडथळे तसेच अदाणी फाऊंडेशनचे नितीन शिराळकर यांच्या नेतृत्वात तालुक्यातील चुरडी,गराडा,चिखली व भिवापुर या गांवामध्ये राबविण्यात आले.नागरिकांनी या अभियानात सहभागी होत स्वच्छतेविषयीची शपथ घेतली.तसेच शाळेतील विद्यार्थी व गावकरी यांनी प्रभातफेरी काढून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.तसेच काही विध्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून सुध्दा स्वच्छतेचे महत्व पटवुन दीले.

तसेच कार्यक्रमाला उपस्थीत नागरीकांच्या हस्ते शाळा व ग्रामपंचायत परीसरात व्रुक्षाराेपन करण्यात आले.स्वच्छाग्रह उपक्रमाविषयी बोलतांना सी.पी.साहु म्हणाले की, ज्याप्रमाणे गांधीजीची सत्याग्रह चळवळ सत्याचा आग्रह धरणारी हाेती त्याच धरतीवर अदानी फाऊंडेशनचा स्वच्छाग्रह हा कार्यक्रम स्वच्छतेचा आग्रह धरणारा आहे.कार्यक्रमामध्ये गांवातील महीला बचत गट,भजनी मंडळ,युवक मंडळ,नागरीक तसेच जिल्हा परीषद शाळेच्या विध्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साै. छायाताई रंगारी सरपंच,चिखली,जगदेवजी आमकर सरपंच गराडा, साै.दुर्गाताई भगत सरपंच भिवापुर,साै.पल्लवी ताई भाेयर सरपंच चुरडी यांच्यासह सर्व ग्रामपंचायतचे उपसरपंच,ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.