आदिवासी विद्यार्थ्यांना विम्याचे संरक्षण : राज्यमंत्री परिणय फुके

0
18

नागपूर,दि.24 : आदिवासी विभागातील सर्व विद्यार्थ्यांना विम्याचे संरक्षण देण्याचा विचार आहे. सर्व योजनांसाठी डीबीटी लागू करू, अशी माहिती नवनियुक्त आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम व वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिली.राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रविवारला त्याचे प्रथमच नगरागमन झाले. फडणवीस मंत्रिमंडळातील ते सर्वांत तरुण मंत्री आहेत. दरम्यान, त्यांनी दीक्षाभूमी, गणेश टेकडी मंदिराला भेट दिली. चाहत्यांनी त्यांची जल्लोषात स्वागत केले.यावेळी त्यांच्यासोबत पत्नी डाॅ.परिणिता फुके,भंडारा-गोंदियाचे खासदार सुनिल मेंढे,भाजप जिल्हा महासचिव रविकांत बोपचे,गोंदिया जिल्हा बँक संचालक रेखलाल टेंभरे,प.स.सदस्य गुड्डू लिल्हारे यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री म्हणाले, मंत्रिपदासाठी 90 दिवस मिळतील. या कमी वेळात अनेक लोकाभिमुख कार्य करायचे आहेत. “चॅलेंज’मध्ये काम करण्यात अधिक मजा असते. आदिवासी विभागाचे काही प्रश्‍न असून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील. आदिवासी विभाग अधिक गतिमान करण्यावर भर राहील. विद्यार्थ्यांना योजना आणि साहित्यांचा लाभ मिळावा यासाठी सर्व योजनांसाठी डीबीटी करण्यात येईल. सध्या काहीच योजनांसाठी डीबीटी सुरू आहे. आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विमा काढण्याचा विचार आहे. मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना याचा लाभ देण्याबाबत विचार सुरू आहे. सर्व आदिवासी शाळा, आश्रमशाळांना आवश्‍यक साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींकडून टाकण्यात आलेल्या विश्‍वासबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.तसेच पक्षाने आदेश दिल्यास आपण नागपूरएैवजी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उभे राहू शकते असे सांगत त्यांनी गोंदिया,तिरोडा,साकोली व तुमसर मतदारसंघावरआपली नजर रोखून ठेवली आहे.

>बायोडाव्हर्सी पार्कमध्ये 50 हरीणअंबाझरीत बायोडाव्हर्सी पार्क तयार करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी याचे उद्‌घाटन करणार असून, येथे 50 हरणे सोडण्यात येतील. येथे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लान्ट तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा निवडणूक लढवू, असे ते म्हणाले. भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक स्थानिक मुद्यांवर होती. तर सार्वत्रिक निवडणुका ही देश केंद्रित होती. लोकांनी मोदींना पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.