पाणी टंचाई उपाययोजना २० नविन विंधन विहिरींना मान्यता

0
20

गोंदिया ,दि.२४. : जिल्हाधिकारी गोंदिया यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन देवरी तालुक्यातील १० गावे/वाड्यामध्ये, सडक/अर्जुनी तालुक्यातील ४ गावे/वाड्यामध्ये आणि तिरोडा तालुक्यातील ६ गावे/वाड्यामध्ये, अशा एकूण २० नविन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
देवरी तालुक्यातील जांभुळदंड(गोटोबोडी) येथे सुभाष उईके यांच्या घराजवळ, पिंडकेपार येथे श्रावण कोसमे यांच्या घराजवळ, भोयारटोला येथे पुंडलिक राऊत यांच्या घराजवळ, आवारीटोला येथे दुलीचंद मेंढे यांच्या घराजवळ, पुजारीटोला येथे श्रीधर भोंगाडे यांच्या घराजवळ, मुरदोली येथे श्रीमती पुष्पा पंधरे यांच्या घराजवळ, मरामजोब (मुरदोली) येथे केशव शहारे यांच्या घराजवळ, पांढरवाणी येथे साई शहारे यांच्या घराजवळ, मुंडीपार येथे सईबाई तवाडे यांच्या घराजवळ, सुंदरीदंड (मरेगाव) येथे रामदास दर्रो यांच्या घराजवळ.
सडक/अर्जुनी तालुक्यातील खजरी येथे नरेंद्र चौधरी यांच्या घराजवळ, पाटेकुर्रा येथे निलचंद बोपचे यांच्या घराजवळ, कोहळीटोला येथे लेकराम लंजे यांच्या घराजवळ, सितेपार येथे एकनाथ सरनागत यांच्या घराजवळ. तिरोडा तालुक्यातील इंदोरा खु.(लेंडीटोला) येथे सुखदेव ठाकरे यांच्या घराजवळ, विहिरगाव येथे श्रीमती चंद्रकला ठाकरे यांच्या घराजवळ, धादरी येथे श्री.नागपूरे यांच्या घराजवळ, बघोली येथे जयेंद्र गजभिये यांच्या घराजवळ, मेंदीपूर येथे श्रीकिशन ठाकरे यांच्या घराजवळ, बोरा येथे समाज मंदिराजवळ, अशा एकूण २० ठिकाणी २१ लक्ष ७६ हजार २४० रुपयांमधून नविन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.