26.1 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ भाजपाची जिल्हा बैठक व सत्कार समारंभ ३० रोजी

भाजपाची जिल्हा बैठक व सत्कार समारंभ ३० रोजी

0
37

राज्यमंत्री फुके, खा. सुनील मेंढे व आ. पुराम यांचा सत्कार

गोंदिया,दि.29 : भारतीय जनता पार्टीची विस्तारीत जिल्हा बैठक रविवार ३० जून रोजी दुपारी १२ वाजता पवार बोर्डिंग कन्हारटोली येथे आयोजित करण्यात आली आहे.या प्रसंगी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे व अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले आमदार संजय पुराम यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत प्रामुख्याने विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार इंजि. राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले,  नगराध्यक्ष अशोक इंगळे, विनोद अग्रवाल, सर्व माजी खासदार व आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व महामंत्री, मंडळ अध्यक्ष, महामंत्री यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वीरेंद्र अंजनकर, भाऊराव उके, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे यांनी केले आहे..
blank