जामखुर्दचे सरपंच बुरांडेंचा जि.प.अध्यक्ष भोंगडेंच्या हस्ते सत्कार

0
15
पोंभूर्णा,दि.29ःःतालुक्यातील ग्रामपंचायत जामखुर्द येथील निवडणूकीत भाजपाचे बंडु बुरांडे हे सरपंच पदी  विजयी झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम पोंभूर्णा येथे 28 जूनला पार पडला.या कार्यक्रमात भाजपाचे  जेष्ठ नेते प्रमोद कडु ,सुदेश कापरर्तीवार ,संघटन प्रमुख राम लखिया , भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटिवार , सरचिटनीस ईश्वर नैताम ,पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख ,नगराध्यक्ष श्वेताताई वनकर ,पाणीपुरवठा व आरोग्य सभापती सुनिता मँकलवार ,शिक्षण सभापती मोहन चलाख ,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय म्हस्के ,सरचिटनीस रोशन ठेंगने ,मांडवगडेजी ,  माजी सरपंच संजय कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते.ग्राम विकासाकरिता आपण कटीबद्ध असल्याचे अभिवचन नवनिर्वाचित सरपंच बंडु उर्फ धनराज बूरांडे यांनी उपस्थितांना दिले.