24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ रब्बीतील धान खरेदीचा पेमेंट द्या-एॅड.पी.सी.चव्हाण

रब्बीतील धान खरेदीचा पेमेंट द्या-एॅड.पी.सी.चव्हाण

0
57

गोेरेगाव,दि.०१ः-गेल्या मे महिन्यापासून मार्केqटग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून शासकीय धान खरेदी केंद्रावरुन खरेदी करण्यात आलेल्या रब्बी हंगामातील धान खरेदीचे पेमेंट गेल्या दोन महिन्यापासून न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाने त्वरीत रब्बी हंगामातील धान खरेदीचे पेमेंट द्यावे अशी मागणी गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष एॅड.पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.रब्बी हगांमाची शासकीय धान खरेदी ३० जून रोजी बंद झाली असली तरी शेतकèयांना मात्र अद्यापही विकलेला धानाचा पेमेंट व बोनस अद्यापही मिळालेला नाही.त्यातच खरीप हंगामातील धान विक्रीचेही बोनस व पेमेंट अद्याप काही शेतकèयांना न मिळाल्याने खरीप हंगामाच्यावेळी बि बियाणे व खत खरेदीकरीता शेतकरी अडचणीत सापडल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.जिल्हाधिकारी यांनी याकडे त्वरीत लक्ष देऊन रब्बी हंगामातील खरेदी केलेल्या धानाचे पेमेंट देण्यासाठी पुढाकार घ्यावे अशी मागणी केली आहे.