३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण

0
38

गोंदिया,१ जुलै : ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा एक भाग म्हणून आज १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, सहायक वनसंरक्षक नरेंद्र शेंडे, एम.आर.शेख, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती मृणालीनी भूत, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच अन्य कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.