डॉ. पंजाबराव देशमुख व्याज अनुदान, सवलत प्रस्ताव तातडीने सादर करा – सुनिल फुंडे

0
17
सेवा सह. संस्थांच्या आर्थिक फायद्यासा’ी अध्यक्षांनी कामाला लागावे
भंडारा दि.१ : : शासनाकडून मिळणारे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज अनुदान सवलतीचे सन २०१७-१८ व २०१८-१९ चे प्रस्ताव ज्या सेवा सह. संस्थांनी, संबंधित सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अद्यापही सादर केले नाही, अशा सेवा सहकारी संस्थांनी ताबडतोब अहवाल सादर करावा अन्यथा योजनेपासून वंचित राहावे लागेल, अशी कळकळीची विनंती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केली आहे. कारण संबंधातील शासनाकडे उपलब्ध असलेला निधी शासनाकडेच परत जाण्याच्या स्थितीत असल्याने संबंधीत संस्थांनी दि. ६ जुलै पर्यंत आपल्या संस्थेचे व्याज अनुदान प्रस्ताव, आपल्या तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात सादर करावे असे आवाहन सुनिल फुंडे यांनी केले आहे.
आपल्या संस्थेचे प्रस्ताव वरील तारखेनंतर शासनाला प्राप्त झाल्यास व शासनाने संबंधित निधी शासनाकडेच त्वरीत परत मागीतल्यास सदर अनुदानामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होवू शकते. पर्यायाने संस्थेचे स्वत:चे २ टक्के गाळ्याचे उत्पन्न सुध्दा संस्थेला मिळणार नाही. करीता आपल्या संस्थेचे, सन २०१७-१८ व २०१८ -१९चे, शासनाकडून मिळणारे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज अनुदान, सवलतीचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावे, असे जाहीर आवाहन भंडारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले आहे.