नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांचा भव्य सत्कार

0
16

नागपूर,दि.02ः-सुनील मेंढे मित्र मंडळा तर्फे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांचा सपत्नीक सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्या हस्ते नुकताच हॉटेल अशोका, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे, उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य व सुनील मेंढे यांच्या पत्नी शुभांगी मेंढे आणि मित्र मंडळ परिवारासहित उपस्थित होते.
याप्रसंगी नितीनजी गडकरी यांनी सुनील मेंढे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील कार्याचे भरभरून कौतुक केले. तसेच त्यांच्या व्यावसायिक यशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार सुद्धा कारणीभुत असल्याचे नमूद केले. नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीचे कौतुक करतांना खासदार म्हणुन पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांनी मेंढे यांना आशीर्वाद देखील दिले.चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मेंढे यांना पुढील वाटचालीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचा विश्वास दिला.
यावेळी खा. मेंढे आपले वडील कै. बाबुरावजी मेंढे यांच्या आठवणीत भावूक होत म्हणाले की सामाजिक आणी राजकीय क्षेत्रात काम करतांना नातेवाईक, मित्रमंडळी आणी मार्गदर्शक यांचा खूप मोठा आधार असतो. अशा सर्वांच्या वतीने झालेल्या सत्कारातून मला माझे काम अधिक जोमाने करण्याची उर्जा मिळाली आहे. तसेच या प्रसंगी  पंतप्रधान नरेन्द्र मोदी, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे,परिणय फुके, असंख्य मित्रमंडळी वं परिवारातील सदस्यांचे आभार मानले. मतदार संघातील सर्व नागरिकांच्या सेवेसाठी वं मतदार संघाच्या विकासासाठी पूर्णवेळ तत्पर राहण्याचे आश्वासन दिले.