१४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फिरते पोलीस ठाणे

0
17

गोंदिया,दि.02 : पोलिसांविषयी नागरिकांच्या मनात असलेली भिती दूर करण्यासाठी व पोलीस आणि जनता यांचे नाते अधिक दृढ व्हावेत यासाठी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना गावा-गावामध्ये फिरते पोलीस ठाणे (शिबिर/कॅम्प) घेण्याचे आदेश दिले. २९ जून रोजी जिल्ह्यातील १४ पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एका गावात फिरते पोलीस ठाणे शिबिर घेण्यात आले.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरा येथे, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कटंगी, रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंभोरा येथे, तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गराडा, दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवेगाव, गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांगडी, गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोदलागोंदी, आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंजोरा, डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांढरी, देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सालई, नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोहलगाव, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिरोली, केशोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडेगावबंध्या व सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनपुरी येथे हे फिरते पोलीस ठाणे शिबिर घेण्यात आले.
ज्या ठिकाणी फिरते पोलीस ठाणे उपक्रम २९ जून रोजी राबविण्यात आला. त्या शिबिरात नागरिकांना आॅनलाईन फसवणूक कशी होते. एटीएममधून फसवणूक, सायबर गुन्ह्यांची माहिती, महिला घरगुती हिंसाचार, महिला बाबतचे इतर कायदे, महिला, बालके, वृद्ध यांच्या सुरक्षिततेसाठी सुरु करण्यात आलेल्या स्त्री स्काडबाबत माहिती देत शासनाच्या विविध विभागातील विविध योजनांची माहिती, नक्षल चळवळीचे नुकसान व नक्षल आत्मसर्मपण योजनेबाबत माहिती देण्यात आली.