25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ पालकमंत्री डॉ.परिणय फुके रविवारला जिल्ह्यात

पालकमंत्री डॉ.परिणय फुके रविवारला जिल्ह्यात

0
23

गोंदिया दि.6ः- सार्वजनिक बांधकाम,वन व आदीवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री डॉ.परिणय फुके हे 7 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.6 जुलै रोजी भंडारा येथील कार्यक्रम आटोपून रात्री 9 वाजता मोटारीने गोंदिया विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक पवार बोर्डिंग व शितला माता मंदिर चौक येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सकाळी 10::15 वाजता सांस्कृतिक पवार बोर्डिंग येथे आयोजित समाज प्रबोधन मेळावा,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शहीद स्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील.दुपारी 12:30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित इयत्ता 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण दिव्यांग विद्यार्च्यांच्या गौरव समारंभाला उपस्थित राहतील.दुपारी 1 वाजता चांदणी चौकातील दुर्गा मंदिर येथे आयोजित प्राणप्रतिष्ठा समारंभाला उपस्थित राहतील, दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव,दुपारी 3 वाजता तिरोडा मार्गावरील ड्रीम गार्डन लॉन येथे आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित राहून सोयीनुसार मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.