महावितरणच्या गोंदिया परिमंडळात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

0
16

गोंदिया 5 जुलै :- महावितरण गोंदिया परिमंडळाच्या वतीने गोंदिया मंडलातील विविध कार्यालयात सुमारे 1हजार 900 वृक्षांची लागवड करण्यात येणार असुन या मोहिमेचा शुभारंभ 33/11 के. व्ही. उपकेंद्र सुर्यटोला, गोंदिया येथे परिमंडळाचे मुख्य़ अभियंता श्री. सुखदेव शेरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आाला.
1 जुलै ते 7 जुलै दरम्यान 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा राज्यशासनाचा संकल्प़ आहे या संकल्पात महावितरणच्यावतीने मोठे योगदान देण्यात येत असून त्याअंतर्गत गोंदिया परिमंडळातंर्गत येणा-या गोंदिया मंडलातील विविध कार्यालयात 1 हजार 900 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महावितरण गोंदिया च्या वतीने मागिल वर्षीही संपुर्ण परिमंडळात मोठया प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली होती. वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याची जवाबदारी प्रत्येक कर्मचा-याला देण्यात आली आहे.
33/11 के. व्ही. उपकेंद्र सुर्यटोला, गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात गोंदिया विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शरद वानखेडे, गोंदिया शहर उपविभागाचे अति.कार्यकारी अभियंता श्री. आनंद जैन, उपकार्यकारी अभियंता श्री. गौतम भागवत, सहा. अभियंता श्री. सुनिल रेवतकर, श्री. अश्विन शहाणे, श्री. सागर डेकाटे, उमेश पांडे, कनिष्ठ़ अभियंता श्री. प्रदिप मोहीतकर, श्री. चैतंन्येश्व़र निखार तसेच परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनीही याप्रसंगी वृक्षारोपण करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.