मुकाअ वाहनचालकावर मेहरबान,चालकाच्या हयगयीने तुटले काच

0
24

गोंदिया,दि.08ः-गोंदिया जिल्हा परिषद सध्या विविध विषयाने चांगलीच गाजत आहे.त्यातही या जिल्हा परिषदेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याने ही कसली आयएसओ जिल्हा परिषद म्हणण्याची वेळ अधिकार्यांनीच आणूऩ ठेवली आहे.माऊंट आबुचे देयके दोनवर्षापासून प्रलबिंतचा विषय असो की सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्यावर महिला कर्मचारीने केलेल्या आरोपाचा विषय हे सुरु असतानाच परिचर पदावरून वाहनचालक पदावर पदोन्नती मिळालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनचालकाने गेल्या 10 ते 15 दिवसापुर्वी हयगयीने वाहन चालवून त्या वाहनाचे मागचे काच एका खांबाला ठोकल्याने फुटल्याचे प्रकरण समोर आले आहे.सदर जांभुळकर नामक वाहनचालक हे मरारटोली भागातील पंचायत समिती काॅलनीमध्ये जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाच्या एका कर्मचार्याला भेटायला गेले होते,परंतु ते तिथे राहत नसल्याचे कळल्यानंतर ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनचालकाने वाहन मागे घेण्याचा प्रयत्नात त्या परिसरात असलेल्या एका खांबाला काचेचा भाग लागल्याने तो काच पुर्णता फुटला गेला.त्या प्रकरणानंतरही त्या वाहनचालकावर सामान्य प्रशासन विभागाने कुठलीच कारवाई केलेली नसल्यची चर्चा सुरु आहे.तर सदर वाहनचालक हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वाहनचालक असल्याने त्यांना गोंदिया मुख्यालयी राहणे अनिर्वाय असतानाही ते सडक अर्जुनीवरून ये-जा करीत असल्याचेही समोर आले आहे.मुकाअ यांना जर सकाळीच देवरी,अर्जुनी मोरगाव असो की नागपूरला जायचे असल्यास जिल्हा परिषदेतील चर्चेनुसार मुख्यालयापासून मुकाअ हेच आपले वाहन चालवित सडक अर्जुनी पर्यंत जातात आणि सडक अर्जुनी येथे तो वाहनचालक वाहन ताब्यात घेतो.मुकाअ सारख्या अधिकार्याला जर वाहन चालवित जाण्याची वेळ एका मुख्यालयी न राहणार्या वाहनचालकामुळे येत असेल तर सामान्य प्रशासन विभागाने मुकाअकरीता मुख्यालयी असलेला वाहनचालक उपलब्ध करुन देण्यास का टाळाटाळ करीत आहे अशा प्रश्नही उपस्थित होत आहे.मुकाअ यांच्या वाहनावर असलेले वाहनचालक आंबेकर यांच्याबद्दल कुठीलच तक्रार नसतांनाही त्यांना काढून नव्याने पदोन्नत झालेल्या वाहनचालकाला सरळ मुकाअ यांचे वाहन देण्याची घाई सामान्य प्रशासन विभागाने का केली अशा अनेक प्रश्नांना पेव फुटले आहे.