युवा भोयर पवार मंच नागपूर तपपुर्ती वार्षिक महोत्सव ४ ऑगस्ट रोजी

0
21

नागपूर,दि.१५: युवा भोयर पवार मंच नागपूरच्या तपपुर्ती महोत्सवाचे आयोजन ४ ऑगस्ट रोजी स्थनिक हलबा समाज सभागृह, स्वावलंबी नगर, नागपूर येथे करण्यात येणार आहे. वार्षिक महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रा. सरिता बोबडे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून सल्लागार सुक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे सुधीर दीवे उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एन.डी. राऊत, रमेश टेंभरे, वसंत खवशे, कौशिक चौधरी, किशोर हजारे, अशोक पाठे, रqवद्र टेंभरे, डॉ. तीर्थनंदन बनगरे, गणेश पठाडे उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी डॉ. मनोज साल्येकर यांचे करीअर वर मार्गदर्शन, डॉ. महेंद्र घागरे यांचे आरोग्य मार्गदर्शन, वंदना नागेश घगारे यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. जीवन गौरव पुरस्कार आणि विविध कार्यक्षेत्रात नावलौकीक मिळविणाèया व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता १० वी १२ वी मध्ये ७५ टक्के च्यावर गुण प्राप्त करणाèया विद्याथ्र्यांचा व पदवीधर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील होतकरु विद्याथ्र्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येईल.
युवा भोयर पवार मंचचा वार्षिकांक इनर्किडीबल युवा २०१९ चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात नि:शुल्क चिकित्सा शिबिर तसेच आयुष ब्लड बँकेद्वारे रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे. समाजबांधवासाठी लघु निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात विषय मै और समाज, न्यु इनोव्हेशन, मै और गॅझेट्स या विषयावर २५० शब्दापर्यंत भोयरी/पवारी, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत मागविण्यात आले आहे. उत्कृष्ट निबंधांना पुरस्कृत करण्यात येईल.
समाजबांधवांनी विद्याथ्र्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा भोयर पवार मंचकडून करण्यात येत आहे. संपर्काकरिता सुरेश देशमुख, श्रावण फरकाडे, अंजु देवासे यांच्याशी संपर्क साधावे.