अदानी फाऊंडेशऩा पुढाकार,१0 हजार शेतकरी करतात सेंद्रिय भात लागवड

0
21

तिरोडा,दि.15 : शेतकर्‍यांचा लागवड खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने अदानी फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यातील शेतकर्‍यांना ‘श्री’ पद्धतीने सेंद्रीय भात लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम गत ५ वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे आजघडीला १0 हजार शेतकरी सेंद्रिय पद्धतीने धानाचे उत्पादन घेत आहे.
यावर्षी अदानी फाऊंडेशनतर्फे खरीप हंगामापूर्वी शेतकर्‍यांमध्ये श्री पध्दतीने सेंद्रिय भात लागवडी संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी तिरोडा तालुक्यातील ६४ गावांमध्ये प्रचाररथच्या माध्यमातून अभियान चालविण्यात आले. तसेच अदानी फाऊंडेशन, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गावपातळीवर श्री पद्धतीने सेंद्रीय धान लागवडीचे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, माविमचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाचे कर्मचारी व अदानी फाऊंडेशनतर्फे कृषी स्वयंसेवकांच्या माध्यमातून शेतकर्यांनी श्री पध्दतीने सेंद्रीय धान लागवडीचा अवलंब करावा, यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासोबतच अदानी फाऊंडेशनच्या वतीने शेतकर्‍यांना गादी वाफा, रोवणी, सेंद्रीय खते, कीड नियंत्रके तयार करण्याचे प्रात्याक्षिक व प्रशिक्षण तसेच प्रती शेतकरी ४ किलो बियाणे व माकिर्ंग रोपचे वितरण १0 हजार शेतकर्‍यांना करण्यात आले आहे.
श्री पध्दतीने सेंद्रीय धान पिकाची लागवड केल्यास, उत्पादन खर्च हा ३0 टक्के कमी होत असून उत्पादनात हमखास २५ ते ३५ टक्के वाढ होते. त्यामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्याच्या उत्पन्नात भर पडते. यामुळे शेतकर्‍यांनी श्री पध्दतीने सेंद्रीय धानपिकाची लागवड करावी, असे आवाहन अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी केले.