बडोलेंच्या हस्ते विधवा महिलांना धनादेश वाटप

0
27

अर्जुनी मोरगाव,दि.19 : राष्ट्रीय अर्थसाहाय्य कुटुंब योजनेंतर्गत तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे १७ जुलै रोजी तालुक्यातील २४ विधवा महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयेप्रमाणे ४ लाख ८० हजाराचे धनादेश आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, दक्षता समितीचे अध्यक्ष शिवनारायण पालिवाल, खविसचे अध्यक्ष नामदेव कापगते, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, कृउबास उपसभापती लायकराम भेंडारकर, प्रकाश गहाणे, रामलाल मुंगणकर, देवेंद्र टेंभरे, विजय कापगते, शीतल लाडे, शशिकला भाग्यवंत, व्यंकट खोब्रागडे, नूतन सोनवाने, तहसीलदार विनोद मेश्राम, गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, विनोद नाकाडे प्रामुख्याने उपस्थित होते. .

पतीचे छत्र हरपल्याने दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या महिलांना २० हजार रुपये शासनाकडून राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून हे धनादेश देण्यात येते. तालुक्यातील सुरेखा ताराम, सरिता उईके, कुसुम नेवारे, शोभा नंदेश्वर, संजिता मेश्राम, नलिनी लाडे, प्रमिला नाकाडे, रंजना सांगोळे, जासुंदा लांजेवार, ललिता ठाकरे, सीता गजभे, पुष्पा फुलबांधे, अनिता साखरे, वंदना करपते, गोपिका मेश्राम, पुष्पा मेश्राम, मंगला कुंभरे, प्रमिला सोनवाने, सुमन वल्के, तनुजा भोवते, सुष्मा लांजेवार, मीरा गेडाम, माया माझस्कर या विधवा लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार सानुग्रह मदतीप्रमाणे एकूण २४ विधवा महिलांना ४ लाख ८० हजाराचे धनादेश आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. .