जिल्हाधिकारी कार्यालय एसएमएसद्वारेनागरिकांना देणार प्रकरणांची माहिती

0
11

गोंदिया,दि: १९ : जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या विविध अपील प्रकरणात वारंवार येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी तसेच प्रशासकीय कामात पारदर्शीता आणण्यासाठी व नागरिकांच्या पैसा व वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अपील प्रकरणात संबंधितांच्या मोबाईलवर एस.एम.एस.द्वारे सुनावणीची दिनांक व वेळ याबाबतची पूर्व सूचना देण्याकरीता प्रायोगिक तत्वावर ही सुविधा नुकतीच सुरु केलेली आहे.
अनेकदा प्रशासकीय कामकाजाच्या व्यस्ततेमुळे किंवा महत्वाच्या कामांमुळे अपील प्रकरणाची सुनावणी होत नाही. त्यामुळे सुनावणीसाठी दूरवरुन येणाऱ्या नागरिकांचा वेळ, प्रवास व पैशाचा अपव्यय होतो. तसेच काही कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यास त्याची सूचना तथा दिनांक व वेळेची माहिती मोबाईलवर एस.एम.एस.द्वारे संबंधितांना देण्यात येईल. त्यामुळे नागरिक ठरविलेल्या तारखेस वेळेत उपस्थित राहतील. अपील प्रकरणात असलेल्या सर्व संबंधितांना या सुविधेमुळे लाभ होणार आहे. तरी जिल्ह्यातील संबंधित नागरिकांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
०००००
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
गोंदिया : जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, १२ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ कर्जमाफी संबंधाने तक्रारी निवारणाकरीता तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांना सदर योजनेबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी अडचणी दूर करण्याकरीता संबंधित तालुका सहायक निबंधक/सहकार अधिकारी श्रेणी-१ कार्यालयातआपली तक्रार दाखल करावी अथवा समक्ष भेट दयावी. तसेच आपले समाधान न झाल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था गोंदिया कार्यालयात तक्रार दाखल करावी अथवा समक्ष भेट दयावी. असे सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक एस.पी.कांबळे यांनी कळविले आहे.
०००००