हैद्राबादच्या चौथ्या ओबीसी महाधिवेशऩात सहभागी व्हा

0
7

नागपूर,दि.23:  राष्ट्रीय ओबीसी महासंघ व तसेच ओबीसी समूहात मोडणाèया समस्त जातीय-पोटजातीय संघटनांच्या रविवार २१ जुलैला झालेल्या बैठकीत हैद्राबाद येथे आयोजित चौथ्या ओबीसी महाअधिवशनाला यशस्वी करण्यासाठी महारााष्ट्रातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केले. ते धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी डॉ. तायवाडे  महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनाच्या दबावात विविध मागण्या मान्य केल्या आहेत. ओबीसी मंत्रालयाला ३० हजार कोटीची तरतुद करण्यात यावी तसेच या शैक्षणिक सत्रापासून ओबीसीं विद्याथ्र्यांचे वस्तीगृह सुरु व्हावे व केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करावी यासाठी स्थानिक पातळीवर सर्व ओबीसी संघटनांनी शासन-प्रशासन व लोकप्रतिनिधीवर दबाव निर्माण करावा असे म्हणाले. यावेळी मंचावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, सहसचिव प्रा.शरद वानखेडे ,खेमेंद्र कटरे  महिला अध्यक्ष सुषमा भड, युवा अध्यक्ष  मनोज चव्हान  उपस्थित होते. यावेळी सचिन राजुरकर यांनी तेलंगणा व हैद्राबाचे मुख्यमंत्री या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. तसेच चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने ओबीसी अधिवेशनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. महिला अध्यक्ष सुषमा भड यांनी ही नागपूरातून मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार असल्याचे सांगितले.
सहसचिव खेमेंद्र कटरे यांनी वस्तीगृहासाठी शासनावर दबाव तंत्र आणत सेव मेरीट-सेव मिशन या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी आपल्या सर्वांना काम करण्याची वेळ असल्याचे सांगितले. विद्यार्थी प्रमुख निलेश कोडे यांनी विद्याथ्र्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश लांबट, खुशाल शेंडे, मनोज चव्हाण, सकील पटेल, प्रा. गोपाल सेलोकर आqदनीही अधिवेशनाबद्दल विचार व्यक्त केले.  बैठकीचे संचालन प्रा. शरद वानखेडे यांनी केले. आभार सुभम वाघमारे यांनी मानले. बैठकीला प्रा. सरयू तायवाडे, प्रा.संजय पन्नासे , शकील भाई पटेल, रेखाताई बाराहाते,कल्पनाताई मानकर , उज्वला महल्ले, गौरव बिसेन, पांडुरंग काकडे, सुशांभी हाटोरे,रोशन कुंभलकर, राजू खडसे, भैयाजी रडके आदि ओबीसी समाज बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.