पालकमंत्र्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

0
7

गोंदिया दि. २३: पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी २२ जुलै रोजी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देवून विविध कक्षाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना अधिष्ठातांना दिल्या. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिंमत मेश्राम यांचेसह वैद्यकीय अधिकारी व पदाधिका?्यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्र्यांनी लॉयन्स क्लब गोंदिया व लॉयन्स क्लब गोंदिया सिनियर यांचे वतीने प्रत्येक दिवशी निशुल्क भोजनसेवा आयोजित करण्यात येते. त्या ठिकाणी भेट देवून त्यांच्या कामाचे कौतूक केले. त्यांनी आकस्मिक विभाग, सामान्य रुग्ण कक्ष व परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्याचे, औषधांचा पुरवठा योग्य त्या प्रमाणात करण्याचे निर्देश दिले. जिल्हयातील कोणताही रुग्ण उपचारासाठी येथे आल्यास त्याला चांगले उपचार व सेवा मिळाली पाहीजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्या व प्रश्नांबाबत पुढच्या बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्यात येणार असून विविध समस्या यातून मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करुन केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाच्या समस्यांबाबत अवगत करुन दिले. ईथल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचेकडे बैठक लावण्याबाबत डॉ. मुखर्जी यांना सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिका?्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्या पालकमंत्री यांच्या लक्षात आणून दिल्या .