तणसापासून इथेनॉल,सीएनजी निर्मिती प्रकल्पाच्या जागेची ना.फुंकेनी केली पाहणी

0
20

भंडारा,दि.२३ः तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प भंडारा येथून जवळच असलेल्या मकरधोकडा येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून १५०० कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत सुरु होईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यावर भंडारा -गोंदिया जिल्ह्यातील १० ते १५ हजार युवक- युवतींना रोजगार प्राप्त होणार आहे, असेही ते म्हणाले. सोमवारी (ता.२२) मकरधोकडा येथे पालकमंत्री यांनी जागेची पाहणी केली. शासनाच्या १४६.७ हेक्टर पैकी ४७.७५ हेक्टर जागा या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, जे. बी. संगितराव आर.ओ. एमआयडीसी, कार्यकारी अभियंता डी.एन. नंदनवार, तहसलिदार अक्षय पोयाम, बीपीसीएलचे संजीव पोळ व अधिकारी उपस्थित होते.
भंडारा गोदिया जिल्हयातील २ ते ३ लाख टन तणस या प्रकल्पासाठी लागणार आहे. यातून शेतकèयांना सात ते आठ हजार रुपये हेक्टरी मोबदला मिळू शकतो. असे त्यांनी सांगितले. जागा लवकरच हस्तातरित होणार असून दोन प्रकल्प सुरु करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री मकरधोकडा येथे येतील असे ते म्हणाले. हा प्रकल्प १५०० कोटींचा असून याला १०० एकर जमीन लागणार आहे. भविष्यकालीन तरतूद म्हणून अधिकची जमीन मागणी करणे व उपलब्ध करून देणे याबाबत सूचना देण्यात आल्या. एमआयडीसी यासाठी सर्व सहकार्य करणार आहे. यातून बायो इथेनॉल निर्मिती होणार असून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. परिसरातील धान उत्पादक शेतकèयांना मोठा फायदा या प्रकल्पाद्वारे होणार असून या प्रक्लपाद्वारे दहा ते पंधरा हजार रोजगार निर्मितीसुध्दा होणार आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला यामुळे गती मिळणार आहे.