अदानीत नव्या कंत्राटदाराला काम दिल्याच्या धास्तीने कामगारात असतोंष

0
16

तिरोडा,दि.08 -स्थानिक अदानी विद्युत प्रकल्पात कंपनी बदलल्याने काही कामगारांना कामावरून कमी करण्याची अफवा पसरविण्यात आल्याने प्रकल्पासमोर मोठे आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, एकाही कर्मचाèयास कामावर जाण्यास मज्जाव न करण्यात आल्याने संभावित आंदोलन झाले नसले तरीही प्रकल्प परिसरात तणावपूर्ण शांतता होती.तसेच कामगारामध्ये अद्यापही दहशत असल्याची चर्चा आहे.
तिरोडा येथील अदानी विद्युत प्रकल्पातील कार्यरत एमबी कंपनीतर्फे प्रकल्पात अपेक्षित काम न मिळाल्याने या कंपनीस बंद करून या कंपनीचे काम  १ ऑगस्ट पासून नवीन सहा कंपन्यांना विभागून देण्यात आले आहे. त्यामुळे एमबी कंपनीत कार्यरत काही कर्मचाèयांना कमी करण्यात येईल, अशी अफवा पसरली. यामुळे कंपनीसमोर आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कोणताही अनुचित प्रकार रोखण्यासाठी अदानी प्रकल्पात उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढोके, उपनिरीक्षक वसाके, लाला लोणकर व तिरोडा पोलिस स्टेशन सह गंगाझरी, दवनीवाडा पोलिस स्टेशनचे ४० महिला पुरुष कर्मचारी प्रकल्पाच्या आत दिवसभर ठाण मांडून बसले होते. याशिवाय गोंदियावरून ३० कर्मचाèयांची अतिरिक्त कुमक बोलाविण्यात आली होती. मात्र, एमबी कंपनीत कोण्याही कर्मचाèयास कामावर जाण्यास मनाई न केल्याने कोणतेही आंदोलन झाले नसले तरीही अदानी प्रकल्प परिसरात तणावपूर्ण शांतता होती. याबाबत अदानी प्रकल्पाचे सामाजिक उत्तरदायित्व अधिकारी नितीन शिराळकर यांना विचारणा केली असता प्रकल्पाचे काम योग्यरीत्या चालावे म्हणून कंपनी बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या एमबी कंपनीतील सर्व १ हजार कामगारांना नवीन कंपन्यांत सामावून घेतले असून काही लोकांनी उगाच आंदोलन होण्याच्या अफवा पसरविल्या असण्याची शक्यता असल्याचे सांगत कंपनीचे काम सुरळीत सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.