मानधन व पेंशनकरीता अंगणवाडीसेविकांचे जेलभरो आंदोलन

0
23

गोंदिया,दि.1०:-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती गोंदिया जिल्हा,आयटक,एचएसएम सिटूच्या सयुंक्तवतीने  ९ ऑगस्टरोजी क्रांतीदिनाचे निमित्त साधून राज्यव्यापी जेलभरो आंदोलनांतर्गत अंगणवाडी सेविका,सहाय्यिकांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व आयटक जिल्हाध्यक्ष हौसलाल रहागंडाले,जीवनकला वैद्य,बिरजूला तिडके,विणा गौतम ,राजलक्ष्मी हरिणखेडे, अर्चना मेश्राम,भुनेश्वरी रहागंडाले,दुर्गा सतापे,ज्योति लिल्हारे,अंजना ठाकरे,लालेश्वरी शरणागत,पुष्पकला भगत,विठा पवार,प्रणिता रंगारी,सरिता मांडवकर,शोभा लेप्से,शारदा खोब्रागड़े,प्रेमलता तेलसे,शकुंतला गोंडाने,लिचंडेताई यांनी केले. केंद्रसरकारने जाहिर केलेले १५०० रुपये मानधन देण्यात यावे,मानधनाएैवधी अर्धी पेंशन लागू करण्यात यावे,जुन जुर्ले महिन्याचे मानधन व प्रवास भत्ता एकत्र देण्यात यावे या मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले.जोपर्यंत मानधन व पेंशन लागू होत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.आंदोलनांनतंर जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मनोहर दाभाडे उपस्थित होते.