डॉ. कुंभरे व शंकरलाल मडावी आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित

0
9

अर्जुनी मोर,दि.१३: राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे ८ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त नागपूर येथील सुरेश भट सभागृहात राज्यस्तरीय आदिवासी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात तालुक्यातील धाबेटेकडी/आदर्श येथील आदिवासी समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नाजूक कुंभरे तसेच भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शंकरलाल मडावी यांना आदिवासी सेवक हा मानाच्या पुरस्कार बहाल करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद््घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, अनुसूचित जाती जमाती संघटनमंत्री नाना नवले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आदिवासी सेवक/आदिवासी सेवा संस्था पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदिवासी र% पुरस्कार व इतर विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच आदिवासी विकास विभागाचे संबंधित विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याकरिता विविध संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. तसेच सभागृहाच्या परिसरात आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना व उपक्रमाविषयी स्टॉलची प्रदर्शन लावण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. मिलिंद माने, नंदा जिचकार, निशा सावरकर, डॉ. किरण कुळकर्णी, सुनील पाटिल, डॉ संदीप राठौड., नितिन पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते.