युवा भोयर पवार मंच नागपूरचा वार्षिक महोत्सव उत्साहात

0
22

नागपूर,दि.१३: युवा भोयर पवार मांचातर्फे वार्षिक महोत्सव स्वावलंबी नगर येथील हलबा समाज सभागूह येथे रविवार (दि.४)रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सरीता बोबडे तर उद्घाटक म्हणून न.पा.नागपूरचे शिक्षण सभापती दिलीप दिवे होते. विशेष पाहुणे म्हणून अभाभोप महासंघ शाखा कटोलचे अध्यक्ष वसंत खवसे, नागपूरचे अध्यक्ष कौशिक चौधरी, मंडळ कारंजाचे सचिव किशोर हजारे, मंङळ वर्षाचे अध्यक्ष अशोक पाठे, सहाय्यक शिक्षक निरीक्षक रqवद्र टेंभरे, तिर्थनंदन बन्नगरे, राजाभोज बहु संस्था qहगणाचे अध्यक्ष लिलाखर पटले, गणेश पठाडे, तसेच प्रमुख वक्ता म्हणून डॉ. मनोज साल्पेकर, डॉ. महेंद्र घागरे, प्रा.वंदना घागरे, आदि उपस्थित होते. पाहुण्यांच्या आगमनानंतर समाजातील दिव्यंगत व्यक्तींना सामुहिक श्रद्धांजली देण्यात आली. नि:शुल्क चिकित्सा शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे उदघाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले. दीप प्रज्वलनानंतर महिला मंडळांनी स्वागत गीत प्रस्तुत केले. व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या १२ वर्षाच्या वाटचालींची माहिती दिली. युवा भोयर पवार मंचद्वारे डॉ. ज्ञानेशवर टेंभरे आणि कन्हैयालाल बोबाडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत समाज बाांधवांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्वेता पराडकर, डॉ. विजय पराडकर, नामदेव खडे, डॉ. मनिषा दंडारे, डॉ. अनंत घगरे, पारेंद्र पटले, दिलीप काळभोर, भुपेश बारंगे,संजय ढोले, विनायक नागमोडे,रामेश्वर चोपडे, लिलाधर चोपडे,उत्तमराव ढोले यांचा सत्कार करण्यात आला. लघुनिबंध स्पर्धेचाा निकाल जाहिर करुन विजेते व सहभागी स्पर्धकांना पुरस्कृत करण्यात आले. प्रश्न मंजुषा जितेंद्र फरकाडे व अनुषा देवासे यांनी सादर केली. यावेळी १२ विद्याथ्र्यांना शिष्यृवृत्ती देण्यात आली. पदवीधर १२ वी आणि १० वी तील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. इनक्रेडीबल युवा २०१९ या तपपुर्ती वर्षिाकांकाचे विमोचन करण्यात आले. नि:शुल्क चिकित्सा शिबिरासाठी डॉ.जयश्री चौधरी, आणि डॉ. उदय चौधरी यांनी सहकार्य केले. आयुष ब्लड बँकचे डॉ. रवि भांगे यांच्या सहकार्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. संचालन अंशु देवासे तर आभार सुरेश देशमुख यांनी मानले. सुरुची भोजनानंतर कार्यक़्रमाची सांगता झाली. महोत्सवाला बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रावण फरकाडे, सुरेश देशमुख, गौरव धारपुरे, अजय फरकाडे, विलास डिग्रसे, मुकुंद बन्नगरे, लालचंद चौधरी, सचिव धंडाळे, अरिवंद देशमुख, जीवन देशमुख, सुधाकर ढोले, प्रफुल्ल घागरे, मनोज गोरे, महादेव चोपडे, निलेश फरकाडे, विजया गद्रे, भारती देशमुख, मंदा फरकाडे, सुवर्णा बन्नागरे, शालीनी देशमुख आqदनी सहकार्य केले.