इंगळे चौकात गुरुवारला ध्वजारोहण

0
19

गोंदिया,दि.14 : राष्ट्रदिन पर्व समारोह समिती आणि अभियानाच्या वतीने शहरातील स्व. किशोर इंगळे चौक सिव्हील लाईन येथे उद्या(दि.१५) स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम सकाळी १०.१० वाजता आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या विशेष उपस्थितीत डॉ. सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शीलाताई धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी मृदुला अनंत वालस्कर, द्वारका सावंत, कल्पना इंगळे, पुष्पा चव्हाण, उषा येटरे, पंकज रहांगडाले, भावना कदम, शकील मन्सूरी, सतीश देशमुख, अफसाना पठाण, सविता मुदलीयार, अनिता मेश्राम, विवेक मिश्रा, कुंदा पंचबुद्धे, विनोद पंधरे उपस्थित राहतील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष तथा संयोजक अशोक इंगळे, डॉ. घनशाम तुरकर, जयंतीभाई वस्तानी, डॉ. के. पी. जयपुरीया आदींनी केले आहे.