राज्य शासनाच्या सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी २३ ऑगस्ट रोजी पेंशन अदालत

0
15

वाशिम, दि. १४ : केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या निर्देशानुसार  देशामधील संबंधित राज्य, केंद्र शासित प्रदेशामध्ये ‘पेंशन अदालत’ची आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या लेखा व कोषागारे, नागपूर तसेच महालेखाकार, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्तीवेतन मंजूर न झालेल्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांची निवृत्तीवेतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी  २३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९ ते दु. ४ वा. दरम्यान साई सभागृह, शंकर नगर, अंबाझरी रोड, व्होकार्ड हॉस्पिटलच्या मागे, नागपूर येथे पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

पेंशन अदालतीकरिता मा. महालेखाकार, नागपूरचे प्रतिनिधी उपस्थित राहून कार्यालय प्रमुखांना, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना प्रलंबित निवृत्तीवतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रकरणांची तपासणी करून जागेवरच प्रकरणे निकाली काढणार आहेत. प्रलंबित प्रकरणाची यादी सर्वच कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे. तरी सर्व कार्यालय प्रमुखांनी, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील पेंशन प्रकरणाचे दस्तऐवज घेवून उपस्थित रहावे व जास्तीत जास्त प्रलंबित प्रकरणाचा निपटारा या पेंशन अदालतमध्ये करून घ्यावा, आवाहन असे जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी केले आहे.