पात्र व अपात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी प्रसिध्द

0
7

गोंदिया दि.१५: जिल्हयातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदे भरण्यासाठी २४ जुलै रोजी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीसंबंधी गुणांकनाचे निकष ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात ९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची तर प्राथमिक आरोग्य केंद्रामधील ३० वैद्यकीय अधिकाऱ्यांची अशी एकूण ३९ पदे भरण्यात येणार आहे. १०६ उमेदवारांनी वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखती दिल्या. यामध्ये २० उमेदवार अपात्र ठरले. ७५ बीएएमएस आणि ११ एमबीबीएस उमेदवार पात्र ठरले. जे उमदेवार अपात्र ठरले त्यांना १९ ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. मुलाखतीमध्ये पात्र व अपात्र उमेदवाराची यादी जिल्हाधिकारी गोंदिया आणि जिल्हा परिषद गोंदिया यांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच ही यादी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संकेस्थळावरदेखील प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबतची जिल्हा निवड समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑगस्ट रोजी संपन्न झाली यावेळी समितीच्या सदस्यासह समितीचे सदस्य सचिव डॉ.भूषणकुमार रामटेके यांची उपस्थिती होती.