१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन

0
15

गोंदिया,दि.19ःशासकीय सेवेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा शासन निर्णयानुसार, राज्यातील इतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून पात्र लाभार्थ्यांना नोकरीत सामावून घेतले जात आहे. मात्र, गोंदिया जिल्हा परिषद प्रशासन जिल्ह्यातील अनुकंपा प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना सापत्न वागूणक देत असून गत १0 वषार्पासून ते शासकीय सेवेत नियुक्तीची वाटप पाहत आहेत. त्यामुळे १९ ऑगस्टपयर्ंत अनुकंपा पदभरतीची प्रक्रिया सुरू न झाल्यास २0 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा जिल्हा अनुकंपाधारक संषर्घ समितीने जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदनातून दिला आहे.निवेदन देताना, अनुकंपाधारक जागेश्‍वर धनभाते, संदीप मानकर, रुपम मंडेरले, सुमित बैस, संजय हत्तीमारे, प्रिती गेडाम, संजय शहारे, शिल्पा घरडे, वर्षा पुस्तोडे, कमलेश वाजुरकर, ज्योती पटले, प्रताप सिंह, सुशीला भंडारी आदी उपस्थित होते.
निवेदनानुसार, जिल्ह्यातील अनुकंपाधारक गत १0 वर्षांपासून अनुकंपा प्रतीक्षा यादीनुसार अनुकंपा पदभरती अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती मिळेल, या आशेवर आहेत. विशेष म्हणजे, वयाचे ४५ वर्षे पूर्ण झाल्यास अनुकंपाधारक शासकीय पदभरतीसाठी अपात्र ठरतो. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील अनेक अनुकंपाधारक शासकीय सेवेपासून वंचित राहिले आहेत. तर अनेक अनुकंपाधारकांची वयाची ४५ वर्षे लवकरण पूर्ण होणार आहेत. असे असतानाही गोंदिया जिल्हा परिषद अनुकंपा पदभरती करण्यासाठी उदासीन असल्याने अनुकंपाधरकांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने २८ सप्टेंबर २0१८ रोजी १0 टक्के अनुकंपाधारकांना नियुक्तीचे तसेच ६ जुलै २0१९ रोजी अनुकंपा पदभरती ही २0१९ च्या एकूण रिक्त पदाच्या अधिन राहून करावी व त्यानंतर पुन्हा अनुकंपाभरती करु नये असे आदेश दिले आहेत. त्यानुसार, जानेवारी २0१९ मध्ये प्रतीक्षा यादीतील अनुकंपाधारकांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आली. त्याला आता सात महिन्याचा कालावधी लोटूनही पदभरतीसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, शासनाच्या वरील आदेशाप्रमाणे राज्यातील अनेक जिल्हा परिषदेत अनुकंपा पदभरती प्रक्रिया राबवून पात्र लाभार्थ्यांना नियुक्तय़ा देण्यात आल्या आहेत. मात्र, गोंदिया जिल्हा परिषदेत अद्यापही पदभरती प्रक्रिया सुरु झाली नसल्याने, गोंदिया जिपसाठी शासनाचे वेगळे आदेश आहेत काय? असा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे शासन आदेशाप्रमाणे जिल्हा परिषदेने १९ ऑगस्टपयर्ंत अनुकंपा पदभरती प्रक्रिया सुरु करावी अन्यथा २0 ऑगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.