अर्जुनी मोरगाव मतदारसंघात विकास कामांचे भूमिपूजन

0
18

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.19ः- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येत असलेल्या प्रतापगढ,रामनगर, कढोली,बोडगाव,सुरबन, संजयनगर, गोठणगाव येथे ७६ लाखाच्या १६ विकासकामांचे भुमिपूजन  आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर,जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे,भाजप तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे,रघुनाथ लांजेवार,केवळराम पुस्तोडे,लायकराम भेंडारकर,भोजु लोगडे, पंचायत समिती सदस्य रामलाल मुंगणकर,शिशुलाताई हलमारे,व्यंकट खोब्रागडे,देवेंद्र टेंभरे,विजय कापगते,नमुदेव नागपुरे,संजय खरवडे,सी.बी.टेभुणे,विजय अरोरा,परसराम हटवार,आनंदराव तिडके,शंकुतला वालदे,भागरथाबाई राणे,अहिल्याताई वालदे (सरपंच ग्रा.पं.प्रतापगढ),रेखाताई बछांड (सरपंच ग्रा.पं.रामनगर),दिनदयाल डोंगरवार (सरपंच ग्रा.पं. बोंडगाव/सुरबन),जिजाबाई चांदेवार (सरपंच ग्रा.पं.गोठणगाव) यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ता,ग्रामपंचायत सदस्यगण व सर्व ग्रामवासी उपस्थित होते..

प्रतापगड येथे प्रवेशद्वार बांधकाम पंधरा लक्ष रुपये, स्मशान शेड बांधकाम सात लक्ष रुपये, दर्ग्याकडे जाणारा रस्ता दहा लक्ष रुपये, बिरसा मुंडा स्मारकाजवळ आवार भिंत तीन लक्ष, बौद्ध विहार सिमेंटीकरण आवार भिंत पाच लक्ष रुपये, शिव मंदिर येथे शौचालय व किचन सेट दहा लक्ष रुपये, कडोली येथे बिरसा मुंडा सभामंडप चार लक्ष रुपये, बौद्ध विहार आवार भिंत तीन लक्ष रुपये, दलित वस्ती अंतर्गत नाली बांधकाम पाच लक्ष रुपये, रामनगर येथे सिमेंट रस्ता दहा लक्ष, रामनगर सत्संग सभागृह 5 लक्ष रुपये, प्रवासी निवारा तीन लक्ष, संजय नगर येथे सिमेंट रस्ता दहा लक्ष, प्रवासी निवारा तीन लक्ष ,गोठणगाव येथे ये बुद्ध नगर प्रभाग 1 मध्ये हे सुरक्षा भिंत पाच लक्ष रुपये ,राम मंदिर सभागृह 5 लक्ष, पंचशील बौद्ध नगर सभागृह 5 लक्ष, बोंडगाव सूरबन बुद्ध विहाराजवळ आवार भिंत ,सिमेंटीकरण पाच लक्ष सुरबन बुध्द विहार बांधकाम 4 लक्ष, प्रवासी निवारा तीन लक्ष अश्या एकूण 76 लाखांच्या 16 बांधकामाचे भूमिपूजन आमदार राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले.