माध्य.शिक्षण विभागात आंदोलक शिक्षकांनी केली तोडफोड

0
19

गोंदिया,दि.20ः- गेल्या 9 आगस्टपासून आपल्या वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करणार्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा १2 वा दिवस असूनही अद्याप त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही.त्यातच आम्हाला शाळेत शिक्षक नाहीत कसे करायचे हे विचारायला आलेल्या विद्यार्थ्यांनाच शिक्षणाधिकारी यांनी विनाअनुदानित शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये असे म्हटल्याने.त्या वक्तव्यावर आक्षेप घेत शिक्षणाधिकारी यांनी माफी मागावी यासाठी आंदोलक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यलय गाठले.शिक्षणाधिकारी यांच्यासोबत झालेल्या वादात त्या कार्यालयातील खुर्च्या टेबलांची तोडफोड आंदोलक शिक्षकांनी केल्याने चांगलेच वातावरण तापले.तसेच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरु केल्याने ग्रामीण पोलिसांनी प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेत सर्व आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेतले.

आंदोलक शिक्षकांनी उग्ररुप धारण केल्याने जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.शिक्षण विभागातील साहित्याची तोडफोड केल्याचे वृत्त कळताच गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले.त्यानंतर पोलिसांनी त्या सर्व आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेत वाहनातून पोलीस ठाण्यात नेले.परिणामी सोमवारी (दि.१९) शिक्षकांनी अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून सर्वांचे लक्ष वेधले होते. जिल्हा कृती समितीचे प्रा.के.बी.बोरकर, प्रा.पी.पी.मेहर, व्ही.आर.पोगळे, जे.बी.पटले, ए.एन.कठाणे, आर. एस. जगणे, एस.डी. येळे, एम.टी. चौरे, एम.ए.उके, एम.एल.पटले, प्रतीक मेंढे यांच्यासह महिला पुरुष शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.