भाजप नेत्याच्या सीबीएसई शाळेकडे जाणार्या रस्त्याची दुरावस्था

0
30

गोंदिया,दि.20ः- गोंदिया शहरात नामाकिंत शाळांना मोठ्याप्रमाणात चालना मिळाली आहे.सीबीएसई,इंटरनॅशनलच्या नावावर विद्यार्थ्याकंडून वारेमाफ शुल्क घेणार्या शाळा मात्र आपल्या शाळेकडे जाणारा रस्ता आपल्या वाहनामुळे किती खराब होते याची काळजी घेतांना दिसून येत नाही.त्यातच गोंदियातील छोटा गोंदिया परिसरात असलेल्या गोंदिया पब्लीक स्कुलकडे जाणारा रस्ता बघितल्यावर तर संताप आल्याशिवाय राहणार नाही.भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष असलेले डाॅ.अमित बुध्दे यांच्या शिक्षण संस्थेच्या गोंदिया पब्लीक स्कुलकडे जाणार्या या रस्त्याकडे बघितल्यावर सायकलस्वार व मोटारसायकलस्वारांना किती त्रास सहन करावा लागत असेल नव्हे तर जे विद्यार्थी या रस्ताने पायी ये जा करतात त्यांना रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे आणि त्या खड्यात साचलेल्या पाण्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.मात्र शिक्षणमहर्षी असलेल्या भाजपनेत्यांना हा रस्ता नगरपरिषदेपासून दिल्लीपर्यंत त्यांच्याच पक्षाची सरकार असताना दुरुस्त करण्याचे कसे काय सुचत नाही असा सवाल नागरिकासंह पालकही करु लागले आहेत.