विविध विकासकामांचे विनोद अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन

0
13

गोंदिया,दि.29 : २५/१५ योजने अंतर्गत गोंदिया विधानसभा क्षेत्रात विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य  विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.  देवरी येथे ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून २ लाख रुपये बुद्धविहार सौंदर्यीकरण तसेच ३ लाख रुपये वैनगंगा नदी किनारी सभामंडपासाठी देण्यात येणार आहेत. ग्राम किन्ही येथे दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत १० लाख ५० हजार रुपये देण्यात आले असून ३ लाख रुपये सिमेंट रस्ता बांधकाम, २ लाख रुपये सौंदर्यीकरण, ३ लाख रुपये सिमेंट रस्ता आणि २.५ लाख रुपये रस्ता खडीकरणासाठी देण्यात येतील. ग्राम दासगाव खुर्द येथे ३ लाख रुपये देण्यात आले असून त्यातून विविध विकास कामे केली जातील. ग्राम गिरोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत ८ लाख रुपये देण्यात आले असून ५ लाख रुपये समाज भवन तसेच ३ लाख रुपये सिमेंट रस्ता बांधकामासाठी देण्यात येतील. ग्राम नवेगाव (पा.) येथे सुद्धा विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच ग्राम घिवारी येथे १० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.

यावेळी भाजप महामंत्री भाऊरावजी उके, धनजंय तुरकर,  कलाताई रमेश चौरे (सरपंच) देवरी, चांडोराव पटले, (माजी सरपंच) देवरी,  हनसलालबघेले (माजी सरपंच ) देवरी मुरलीधर जी नागपुरे (उपसरपंच) आणि ग्राम पंचायत सदस्य तसेच  हिरामन  डहाट (सरपंच) किन्ही, राकेश सिंह जतपेले (ग्राम प. उपसरपंच), विक्की बघेले तसेच  रामराज  खरे (प.स.सदस्य) सूर्यमान  चौहान (ग्राम प.उपसरपंच),  नायकराम बिसेन ,बसंतराय चौधरी (त.मु.अध्यक्ष दासगांव ), ज्ञानेशवर वैध, झींगर  पटले(रोजगार सेवक), ग्राम पंचायत सदस्य शुकलाल  बोपचे तसेच राजूभाऊ कटरे (सरपंच) घिवारी, सुनीताबाई नागपुरे (उपसरपंच), ग्रामपंचायत सदस्य छोटीबाई कटरे, रेश्माबाई मेश्राम, संजय चौधरी, ममताबाई लिल्हारे, राजानीबाई ठाकरे तसेच कांताबाई धुर्वे, मेश्रामताई, रोश्निताई कहनावत, शारदा बघेले, नोकलाल जी कहनावत, अलकाताई खांडेकर, दुडूरामजी कहनावत, पदाधिकारी व मोठ्या संख्येने समस्त गावकरी बांधव उपस्थित होते.