गडचिरोली,दि.15 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून सन 2018-19 मध्ये गडचिरोली नगरपरिषदेला 15 कोटी निधी प्राप्त झाले. या प्राप्त झालेल्या निधीमधून आयएसओ मानांकीत पंडीत जवाहरलाल नेहरू नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा रामनगर येथील चार वाढीव तुकडीच्या वर्गखोलीच्या बांधकामासाठी 50 लाख निधीच्या बांधकामाचे भूमिपुजन आज दि. 14 सप्टेंबर रोजी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प.उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिलभाऊ कुनघाडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम सभापती आनंदभाऊ शृंगारपवार, शिक्षण सभापती वर्षा बट्टे, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक प्रविण वाघरे, नगरसेविका रितुताई कोलते, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेवक रमेश भुरसे, वासुदेवराव बट्टे, अभियंता अतुल पाटील, विश्रोजवार, गंधेवार, शेडमाके आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शेडमाके यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.





