दिशाभूल करणाèया प्रभारी कार्यकारी अभियंत्यावर कारवाईचा स्थायीचा निर्ण़य

0
10

पुन्हा सोमवारी होणार स्थायीची बैठक
लपा विभागाचे बंधारेवर होणार सोमवारी निर्णय
स्थायीच्या बैठकीआधी झाली भाजप सदस्य व जि.प.अध्यक्षसाोबत बैठक

गोदिया-जिल्हा परिषेच्या सभागृहात आज झालेल्या विशेष स्थायी समितीच्या सभेत विविध विषयावर चर्चा करीत लघुपाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश गिरी व अति मुकाअ यांनी लोकप्रतिनिधींच्या नावावर सभागृहाची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व जि.प.सदस्य राजेश चांदेवार,कृषी सभापती मोरेश्वर कटरे ,राजलक्ष्मी तुरकर,कुंदन कटारे यांच्यासह भाजप जिल्हाप्रमुख व जि.प.सदस्य विनोद अग्रवाल यांनी केली.
आज जिल्हा परिषदेच्या होणाèया स्थायी समितीच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते,ही सभा वादळी होणार हे निश्चित होते.त्यामुळे भाजपच्या सदस्यांनी आधीच कृषी व पशुसंवर्धन सभापती मोरेश्वर कटरे यांच्या कक्षात भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत बैठक घेतली यात पाटबंधारे विभागाच्या बंधारे विषयावर चर्चा करीत कुठल्याही पध्दतीत विरोध अधिक होऊ नये यासाठी मावळती भाषा वापरत राष्ट्रवादी पक्षात गेलेले जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांच्याशी बैठकी आधी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार दुपारी दीड वाजताच्यासुमारास जि.प.अध्यक्ष यांच्या कक्षात बैठक सुरु झाली यात सीईओ,डेप्यूटी सीईओ यांच्यासह जि.प.सदस्य विनोद अग्रवाल,नेतराम कटरे,सीता रहागंडाले,राजलक्ष्मी तुरकर,कुंदन कटारे,योगेंद्र भगत,रुपाली टेंभुर्णे,कल्याणी कटरे,जि.प.सदस्य श्रीमती दमाहे यांची पती,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश चांदेवार,सभापती मोरेश्वर कटरे,मदन पटले,कुसन घासले,प्रकाश गहाणे व सविता पुराम सहभागी झाले.याबैठकीत अग्रवाल यांनी पुढाकार घेत जिल्हा विकासात आडकाठी नको असे सांगत बंधारे ग्रा.प.स्तरावरच देऊ मात्र हा विषय येथेच थांबवित यावर निर्णय घेण्याची भूमिका घेत विनंती केली.त्यावर सीईओ दिलीप गावडे यांनी डेप्युटी व अति.मुकाअ यांना निर्णय घेत ग्रापंच्या नावे करारनामे करण्यास काही हरकत नसल्याचे सांगितले.त्यावर डेप्युटी सीईओ राजकुमार पुराम यांनी एक आठवड्याचा वेळ यावर अभ्यास करण्यासाठी मागीतला तेव्हा सोमवारपर्यंत अभ्यास करा असे सांगत आजच्या स्थायी सभेत काही विषयावर चर्चा करीत ही सभा सोमवारी पुन्हा सुरु होईल अशी पाश्र्वभूमी तयार करण्यात आली.त्यानंतर दुपारी १ वाजता सुरु होणारी स्थायी समितीची सभा ही दुपारी ३ वाजता सुरु झाली.
सभा सुरु होताच शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपीक भरतीचा विषय विनोद अग्रवाल यांनी उपस्थित करुन त्यावेळी पद रिक्त असतानाही भरण्यात आलेल्यांना स्थायी का करण्यात येत नाही यावर मुद्दा उप्थितत करुन त्यांना स्थायी करण्याासंदर्भात शासनाला अहवाल पाठविण्याची मागणी केली.राजेश चांदेवार यांनी घरकुलाच्या सदर्भात प्रश्न उपस्थित केला.त्यानंतर इतर विषयावर चर्चा करण्यात आली आणि लघु पाटबंधारे विभागाच्या बंधारे प्रश्नावर विनोद अग्रवाल यांनी मागच्या स्थायी समितीच्या सभेत अप्रत्यक्षरित्या भाजपच्या एका सदस्यावर व देवरीचे आमदार तथा गोंदियाचे पालकमंत्री यांना विकासात आडकाठी आणत असल्याचा मुद्दा उपस्थित होऊन तसे वृत्त प्रकाशीत झाल्याचा मुद्दा उचलूत लघु पाटबंधारे विभागाच्या नस्तीच्या वाचनाची मागणी केली.यावर राजेश चांदेवार यांनी मागील सभेत प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश गिरी यांनी देवरीचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या पत्रामुळे कामे थांबविण्यात येत असल्याचे सांगून सभागृहाची दिशाभूल केल्याचा उल्लेख करीत लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याचे म्हणाले.जे अधिाकरी लोकप्रतिनिधींचा अवमान करुन आपली चुक लपविण्याचा प्रयत्न करतात ते आजच्या महत्वपुर्णसभेला सुध्दा गैरहजर असल्याने अशा अधिकाèयाची गरज नाही,हे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत शासनाकडे परत पाठविण्यासदंर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली.योगेद्र भगत यांनीही चुकीची माहिती देणारे अधिकारी नकोत अशी भूमिका घेतली.मागील सभेत सत्ताधारी पक्षाचे सभापती मोरेश्वर कटरे यांनी मुद्दा उपस्थित करुन लक्ष वेधले तेव्हा गिरी यांनी लोकप्रतिनिधीच्या नावाचा उल्लेक केला.त्या लोकप्रतिनिधीनी जर गा.प.ला कामे देण्यात येऊ नये असे म्हटले नसेल तर गिरी यांनी चुकीची माहिती का दिली असे भगत म्हणाले.मदन पटले यांनीही शासन निर्णयाप्रमाणे काम करुन गिरी यांच्यावर कारवाईची मागणी केली.सविता पुराम यांनीही यावर विचार व्यक्त केले.कुंदन कटारे यांनी सभागृहाला चुकीची माहिती देणे योग्य नसल्याचे सांगत सबंधितावर कारवाईची मागमी केली.मोरेश्वर कटरे यांनी गिरी हे उपविभागीय अभियंता असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक चुकीचे प्रकार घडले असून त्यांच्या तक्ररीची मोठी संख्या आङे त्यामुळे त्याना शासनाकडे परत पाठविण्याच्या निर्णयासोबतच त्यांची लाचलुचपतविभागाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.यावर अध्यक्ष विजय शिवणकर यांनी सभागृहातील सदस्याची भावन लक्षात घेऊन चुकीचे माहिती देणारे अति.मुकाअ व प्र.कार्य.अभियंता लपा विभाग यांच्यावर कारवाई प्रस्तावित करीत सर्वसाधारण सभेत सदर कारवाईचा विषय ठेवण्याचे निर्देश दिले.

अडीच तासाच्या बैठकीत मुकाअ दिसले गप्प
स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा सुरु असताना मुकाअ यांच्या नावाचा वारंवार उल्लेख व्हायचा परंतु त्याकडे ते कानाडोळा करीत राहिले.त्यानी कुठल्याही विषयावरील चर्चेत सहभागी होऊन आपली भूमिका मांडण्याची भूमिका न घेतल्याने सीईओ हे गुंगे आहेत की काय असा प्रश्न उपस्थित झाला.राजेश चादेवार यांनी तर चक्क सीईओ यांच्याभूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आ़यएएस नसलेले अधिकारी विकास कामात निर्णय घेतांना कमकुवत ठरतात असा आक्षेप घेत कमकुवत ठरत असल्याचे म्हणाले.