Ø नामांकन मागे घेण्याची अंतिम तारिख 7 ऑक्टोबर
भंडारा,दि. 5 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता तीनही विधानसभा क्षेत्रात उमेदवारांनी नामांकन दाखल केलेल्या अर्जाची आज दिनांक 5 ऑक्टोबरला छाननी करण्यात आली. यामध्ये 4 उमेदवारांचे नामांकन अवैद्य ठरले आहे. यामध्ये साकोली-2, भंडारा व तुमसर प्रत्येकी 1 उमेदवारांचा समावेश आहे. तीनही क्षेत्रात चार उमेदवारांचे नामांकन अवैद्य ठरल्यानंतर 66 उमेदवारांचे नामांकन वैद्य ठरले आहेत. नामांकन अवैद्य ठरलेल्या उमेदवारांमध्ये भंडारा- अनिता कुंजन शेंडे, तुमसर-सदाशिव शिवा ढेंगे तर साकोली- राजेश लहानु काशिवार व नानाजी चेटूले यांचा समावेश आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याची तारिख 7 ऑक्टोबर आहे.
60-तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 16 उमेदवारांनी 28 नामांकन दाखल केले होते. आज छाननीअंती सदाशिव शिवा ढेंगे या उमेदवाराचे नामांकन अवैद्य ठरले आहे. सदर उमेदवाराने प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यात सादर केले नाही. तसेच शपथ घेतली नाही. त्यामुळे त्यांचे नामांकन अवैद्य ठरविण्यात आले. सद्या येथे 15 उमेदवारांचे नामांकन वैद्य ठरले आहे.
61-भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 26 उमेदवारांनी 39 नामांकन दाखल केले आहे. छाननीअंती अनिता कुंजन शेंडे या उमेदवाराचे नामांकन अवैद्य ठरविण्यात आले आहे. सदर उमेदवाराने बहुजन समाज पार्टीकडून नामांकन दाखल केले होते. परंतु त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही. त्यामुळे त्यांचे नामांकन अवैद्य ठरले आहे. सद्या या क्षेत्रात 25 उमेदवारांचे नामांकन वैद्य ठरविण्यात आले आहे.
62-साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 28 उमेदवारांनी 42 नामांकन दाखल होते. आज छाननीअंती दोन उमेदवारांचे नामांकन अवैद्य ठरले आहे. यामध्ये राजेश लहानु काशिवार व नानाजी चेटूले यांचा समावेश आहे. राजेश काशिवार यांनी भारतीय जनता पार्टीकडून नामांकन दाखल केले होते. परंतु पक्षाचा एबी फार्म नसल्याने त्यांचे नामांकन अवैद्य ठरविण्यात आले. नानाजी चेटूले यांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले होते. परंतु त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याने त्यांचे नामांकन अवैद्य ठरविण्यात आले. सद्या या विधानसभा क्षेत्रात 26 उमेदवारांचे नामांकन वैद्य ठरले आहे.
तीनही विधानसभा क्षेत्रात काल 4 ऑक्टोबर पर्यंत 70 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. आज शनिवारला उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा, तुमसर व साकोली यांच्या सतरावर दाखल केलेल्या नामांकन अर्जाची छाननी केलेल्यानंतर 60-तुमसर 15 उमेदवार, 61- भंडारा 25 उमेदवार तर 62- सकोली 26 उमेदवार असे एकूण 66 उमेदवारांचे नामांकन तीनही क्षेत्रात वैद्य ठरले आहेत. 7 ऑक्टोबरला नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे





