अर्जुनी मोरगाव,दि.18ः समाजाच्या उत्थानासाठी संघटना आणी संघर्ष आवश्यक आहे.समाजकारण करतांना स्वार्थ सोडून परमार्थाची भावना मनात असावी. हे कार्य करताना इतर समाजाचाही आदर असावा.समाज निर्मितीसोबत राष्ट्र निर्मिती साधने हे ध्येय उरी बाळगणे ही महत्त्वाचे आहे.या कार्यासाठी त्यागाची आवश्यकता आहे,यातूनच बलशाली राष्ट्र निर्मिती होणार असल्याचे मत योगप्रशिक्षक दादा फुंडेनी व्यक्त केले.
फुंडे स्थानिक प्रसन्ना सभागृहात कुणबी समाज बहुउद्देशीय सेवा संस्था व जिजाऊ महिला ब्रिगेडच्या वतीने आयोजित कोजागिरी पौर्णिमा उत्सवात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी डॉ.दिलीप काकडे,पस सभापती अरविंद शिवणकर, कृउबास उपसभापती लायकराम भेंडारकर,सुनिल तरोने,संघटना ध्यक्ष अनिरुद्ध ढोरे,हिरालाल पेंटर, बंडूभाऊ भेंडारकर,भोजराम रहिले,शुभांगी सुनिल मेंढे,सुनीता हुमे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माँ जिजाऊ, संत तुकाराम महाराज आणि छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन ने झाली.फुंडे म्हणाले,कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे.जोडधंदा म्हणून गोपालन व दुग्ध व्यवसाय करावा.सेंद्रिय शेती ची कास धरावी आणि धान शेती सह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळ भाजीपाला शेती करून उन्नती साधण्याचे आवाहन केले. डॉ.काकडेंनी मुलांना वयाच्या दहाव्या वरश्यापर्यंत मुलांना संस्कारीत करावे या वयात मेंदू रिकामा असतो. मोबाईल चा अति वापर टाळावा,स्पर्धा परीक्षा मध्ये उतरून मोठे अधिकारी होण्यासाठी युवकांनी मेहनत घेण्याचे सांगितले.यावेळी दहावी,बारावीत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रसिद्ध नकलाकार हिरालाल पेंटर यांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा उपस्थितांनी आनंद घेतला.प्रास्ताविक डॉ.दीपक रहिले, संचालन पदमजा मेहंदळे यांनी तर आभारप्रदर्शन गिरीश बागडे नी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




