26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ मंडई, मेला, दंडार, दुय्यम शायरी, आर्केस्ट्रा चे उदघाटन

मंडई, मेला, दंडार, दुय्यम शायरी, आर्केस्ट्रा चे उदघाटन

0
65
गोंदिया दि.6:: गोंदिया विधानसभा मतदार संघातील जनतेने आपल्यावर विश्वास करून प्रतिनिधीत्वाची संधी दिली. हे ऋण मी व्याजासकट परतफेड करण्यासाठी कटीबध्द आहे तसेच मी, या क्षेत्राचा आणि क्षेत्रातील जनता माझी म्हणून माझी जनतेचा प्रतिनिधी अशी ओळख निर्माण झालेली आहे. मला ज्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांचा मी आभारी आहे. आगामी ५ वर्षात कसलाही पक्षपात न करता सर्वांगिण विकासासाठी काम करणार तसेच जनतेने सुध्दा कसलीही शंका कुशंका न बाळगता थेट संपर्क करावे, असे आवाहन आ. विनोद अग्रवाल यांनी केले.
तालुक्यात ठिकठिकाणी मंडई कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यानिमित्त आयोजित मंचावरून संबोधित करताना ते बोलत होते. आ.विनोद अग्रवाल पुढे म्हणाले, क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सतत प्रयत्नरत राहू, क्षेत्रातील जनतेने कोणताही भेदभाव न ठेवता माझ्याशी संपर्क साधावा. जेणेकरून मला सुद्धा समस्यांची जाणीव होईल. सर्वसामान्य जनतेने माझ्यावर विश्वास दर्शविला आहे. त्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही. क्षेत्राच्या विकासासाठी जनतेनेच आपल्याला सहकार्य करावे, असेही त्यांनी व्यक्त केले.तालुक्यातील विविध ठिकाणी मंडईचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी आ.विनोद अग्रवाल हे अनेक मंचावरुन जनतेशी थेट संवाद साधत आहेत.