अहेरी,दि.06 : दिनांक 14 डिसेंबर 2019 ते दिनांक 31 मार्च 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत येडमपल्ली व पल्ले येथील सर्व सदस्य व थेट सरपंच पदासाठी सार्वत्रिक निवडणूकाकरिता तसेच ग्रामपंचायत कुरुमल्ली (प्रभाग क्र.1 व 2), रेगुलवाही (प्रभाग क्र.1 व 2), क्रिष्टापुर दौड (प्रभाग क्र.3), देचली (प्रभाग क्र.2), गोविंदगाव (प्रभाग क्र.1 ), दामरंचा (प्रभाग क्र.1 व 3), येरमणार (प्रभाग क्र.2 व 3), आरेंदा (प्रभाग क्र.1), वट्रा खु.स. (प्रभाग क्र.2), मांडरा (प्रभाग क्र.3), वेलगुर (प्रभाग क्र.1 ) येथील रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणूकीसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक हा 16 नोव्हेंबर 2019 (शनिवार) ते 21 नोव्हेंबर 2019 पर्यंत (गुरुवार) व वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत (दि. 17 नोव्हेंबर 2019 चा रविवार वगळून). नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दि.22 नोव्हेंबर 2019 व वेळ सकाळी 11.00 पासून ते छाननी संपेपर्यंत असेल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा 25 नोव्हेंबर 2019 (सोमवार) असून वेळ दुपारी 3.00 वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह नेमूण देणे व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 25 नोव्हेंबर 2019 (सोमवार) असून वेळ दुपारी 3.00 वाजतानंतर. मतदानाचा दिनांक हा 08 डिसेंबर 2019 (रविवार) असून सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत असेल तसेच निवडणूकीचा निकाल प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2019 (गुरुवार) असा आहे असे तहसिलदार, अहेरी यांनी कळविले आहे.





