23.5 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home राजकीय साकोली काँग्रेस तालुकाध्यक्षपदी होमराज कापगते

साकोली काँग्रेस तालुकाध्यक्षपदी होमराज कापगते

0
42

साकोली,दि.08ः- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शेतमजुर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार नाना पटोले यांच्या निर्देशान्वये जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी जि. प. सदस्य होमराज कापगते यांची साकोली तालुका काँंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
नियुक्तीबद्दल जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रेखा वासनिक, मंदा गणवीर, अशोक कापगते, दीपक मेंढे, शहर अध्यक्ष अश्‍विन नशीने, ओम गायकवाड, जावेद भाई शेख, अँड. आनंद नंदागवळी, उमेश कठाणे, प्रभाकर सपाटे, विनायक देशमुख, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष छाया पटले, शहर अध्यक्ष निर्मला कापगते, भेंडारकर, कुंदना वाढई, उमेश भेंडारकर, नेपाल पटले आदींनी अभिनंदन केले आहे.