23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ नवेगावबांध पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक

नवेगावबांध पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक

0
41

नवेगावबांध,दि.08 : नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या सणांच्या पार्श्‍वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखली जावी. यासाठी पोलीस ठाणे नवेगावबांध येथे ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. चालू नोव्हेंबर महिन्यात ईद- ए-मिलाद, कार्तिक पौर्णिमा, पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मंडई उत्सवात या व इतर धार्मिक घटकांचे सण हे समाधानाने व शांततेने पार पडावे. याकाळात जातीय सलोखा कायम राखला जावा, याबाबत बैठकीत सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
उत्सवादरम्यान कोणतेही समाज विघातक कृत्य कोणत्याही समाज घटकाकडून होऊ नये. याची खबरदारी घेण्यात यावी. कोणत्याही प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याबाबत चर्चा करण्यात आली. याकामी सर्व घटकातील समाजबांधवांनी पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आव्हान ठाणेदार अनिल कुंभारे यांनी केले. मागील महिन्यात तसेच आतापयर्ंत झालेल्या सण उत्सवात शांतता भंग झाली काय याबाबतही चर्चा करण्यात आली. या बैठकीला नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी सदस्य, मुस्लिम कमिटीचे सदस्य असे सर्व २१ सदस्य बैठकीत उपस्थित होते