परिवर्तन पॅनलला धक्का देत,अभिनवने मारली बाजी

0
8

गोंदिया- जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.गोंदियाच्या रविवार २६ एप्रिल रोजी झालेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत पाच पॅनल रिंगणात होते.त्या पतसंस्थेच्या निवडणुकीची मतमोजणी भवभूती रंगमंदीर येथे सुरु असून आत्तापर्यंतच्या निकालात परिवर्तन व समर्थ पॅनलला अद्यापही खाता उघडण्यात यश आले नाही.एकता पॅनलने जिल्हा मुख्यालय गट आपल्या ताब्यात ठेवत एकता पॅनलवरील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे असल्याचेच दाखविल्याची चर्चा होती.त्यातच ग्रामसेवक संघटनेच्या अभिनव पॅनलने तिरोडा पंचायत समिती सस्तरावरील दोन्ही संचालक निवडून आणले आहे.एकता पॅनलचे प्रदिप मेंढे व श्याम लिचडे यांनी विजय मिळविला आहे.समर्थचे संतोष तोमर व पंधरे,परिवतर्तनचे मनोज मानकर व आलोक देसाई यांचा पराभव केला.सचिव पदाच्या निवडणुकीत संजय बनकर जिल्हास्तरावर आघाडीवर होते.विशेष म्हणजे प्रल्हाद शहारे हे तिसर्या क्रमांकावर असल्याचे बोलले जात आहेत.गोंदिया पंचायत समितीमधून ग्रामसेवक संघटनेचे दयानंद फटींग,तिरोडातून श्रीधर अादमने,नरेंद्र अतकरी विजयी झाले आहेत.गोंदिया पसमधून एकताचे अशोक नागरीकर विजयी झाले.मतमोजणी सुरुच असून सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्पष्ट निकाल हाती येणार.