28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ पदविधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिध्द,9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती मागविले

पदविधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिध्द,9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती मागविले

0
34

 गोंदिया : महाराष्ट्र विधान परिषद मतदार यादी 2019 नागपूर विभाग पदविधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकाची प्रारुप मतदार यादी 23 नोव्हेंबर 2019 रोजी सर्व उपविभागीय अधिकारी तसेच सर्व तहसिलदार यांचे कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी. सदर यादीवर 23 नोव्हेंबर 2019 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत दावे व हरकती मागविण्यात आले आहे. तरी संबंधितांनी संबंधित उपविभागीय अधिकारी/संबंधित तहसिलदार यांचे कार्यालयात काही दावे किंवा हरकती असल्यास कार्यालयीन वेळेत सादर करावे. असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवाहन करण्यात येत आहे.

26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान डी.एल.एड.परीक्षा परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू

        गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यामध्ये घेण्यात येणारी डी.एल.एल. परीक्षा नोव्हेंबर-2019 ही 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायंकाळी     5 या वेळेत दोन सत्रात मनोहर म्युन्सीपल हायर सेकंडरी स्कूल गोंदिया येथे घेण्यात येण्यात आहे. परीक्षेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात कलम 144 लागू करण्यात आली आहे. हा आदेश        26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2019 दरम्यान परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी महेंद्र पवार यांनी कळविले आहे.

  2 डिसेंबर रोजी लोकशाही दिन

        गोंदिया : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, अडचणी व गाऱ्हाणी सोडविण्याच्या दृष्टीने       2 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी हया जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी ऐकून घेतील व शासनाच्या विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना संबंधित विभागाच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश देतील. ज्या नागरिकांनी 15 दिवसापूर्वी अर्ज सादर केले आहेत त्यांनीच या लोकशाही दिनात उपस्थित राहून आपल्या अडचणी, तक्रारी व गाऱ्हाणी सादर कराव्यात.