भंडारा( जिमाका ), दि,27:- अतिरिक्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याहस्ते बालकामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियानाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले. तसेच बालकामगार धाडसत्र आयोजित करुन व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. या धाडसत्रामध्ये सरकारी कामगार अधिकारी गु.रा. पंधरे, शिक्षण विस्तार अधिकारी जगदिश उके, आरोग्य सेवक जे.एन. मदारकर, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी के.पी. कळंबे, जी.एम. खैरे उपस्थित होते.
सरकारी कामगार अधिकारी यांच्या नेतृत्वात कृतीदलातर्फे टाकळी, वरठी रोड येथील अनेक विटभट्टयाची तपासणी करण्यात आली. विटभट्टी मालकांना बाल व किशोरवयीन कामगार सुधारित अधिनियम 2016च्या तरतूदींची माहितीपत्रक देवून समजावण्यात आले. पवनी येथील विविध हॉटेल आस्थापनेची तपासणी करुन बालकामगार प्रथेविरुध्द स्टिकर, माहितीपत्रक देवून व हमीपत्र लिहून जनजागृती करण्यात आली.नागरिकांनी बालकामगारांसंबंधी काही तक्रार असल्यास या कार्यालयीन दुरध्वनी 07184-252479 व ई-मेल आयडी [email protected] / [email protected] वर संपर्क साधावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.




