गडचिरोली,दि.28 :जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दि. 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी सु.शं.जाधव, जिल्हा ग्रंथालय निरीक्षक रा.बा. साठे, तांत्रिक सहाय्यक प्र.गो. राठोड, श्री. भोसले व असंख्य वाचक, अभ्यासक यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती हिरळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना श्री. जाधव यांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणती पुस्तके वाचावी याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री लेनिन यांनी केले, प्रास्ताविक प्र.गो.राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन लंकेश मारगाये यांनी केले. कार्यक्रमला वाचक, अभ्यासक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय संविधाना विषयी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा.बा.साठे,प्र.गो.राठोड, सु.शं.भोसले व लेनिन यांनी सहकार्य केले.





