31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ शासनाकडून 7 वी आर्थिक गणना सुरु नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

शासनाकडून 7 वी आर्थिक गणना सुरु नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

0
33

गडचिरोली,दि.28: केंद्र शासनाचे “सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय” (MOSPI)  मार्फत “7 वी आर्थिक गणना” करण्यात येत आहे.  “7 वी आर्थिक गणने” करिता अंमलबजावणी यंत्रणा  म्हणून “सामाईक सेवा केंद्रे”  (सीएससी) यांची “सांख्यिकी संग्रहण अधिनियम 2008” च्या कलम 4 अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे. सदर गणनेकरीता जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली असून जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली “7 वी आर्थिक गणनेसाठी” सदस्य सचिव असून जिल्ह्यातील समन्वयक म्हणून काम करणार आहे.

सदर कामाचे उद्घाटन दि. 26 नोव्हेंबर 2019 रोजी प्रभारी  जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांचेमार्फत करण्यात आले असून सदर कामाची नमुना पाहणी करण्यात आली. सामाईक सेवा केंद्रे(सीएससी) यांचेकडून कामाकरीता 467 पर्यवेक्षक 639 प्रगणकांची नेमणुक करण्यात आलेली असुन गणनेचे काम मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातुन माहिती गोळा करण्यात येणार असून हे काम पुर्ण पेपरलेस असणार आहे. गणने दरम्यान नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळण्याकरीता तसेच सदर काम  व्यवस्थितपणे पार पाडण्याकरीता जिल्ह्यातील नागरिकांनी याकरीता सहकार्य करावे असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी केले आहे. सदर उद्घाटनास प्रभारी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी रमेश पेरगु, संशोधन सहायक तुषार लगे, प्रशांत गटकोजवार, रमेश निखारे तसेच एन.एस.एस.ओ, नागपूर कार्यालयाचे श्री. पौनिकर, सीएसीचे जिल्हा व्यवस्थापक मनिष लांबट, शाहिद शेख, सौरभ धंदरे उपस्थित होते.