31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ कनेरीचे रेशन दुकान रद्द करा-शिवसेनेचे निवेदन

कनेरीचे रेशन दुकान रद्द करा-शिवसेनेचे निवेदन

0
39

अर्जुनी मोरगाव,दि.28ः- तालुक्यातील कनेरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करून नव्याने निविदा काढण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुका शिवसेनेने दिला आहे. तहसीलदारांमार्फत अन्न पुरवठा अधिकाèयांना निवेदन देण्यात आले आहे. कनेरी व केशोरी येथील नागरिकांनी कनेरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी ३० मे २०१९ रोजी शिवसेनेच्या तालुका शाखेला निवेदन दिले होते. शिवसेनेतर्फे ६ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले. अधिकाèयांनी उपोषणकत्र्यांची भेट घेऊन वारवी येथील महिला बचतगटाला स्वस्त धान्य दुकान तात्पुरते जोडण्याचे व ३ महिन्यांत नवीन निविदा काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही रेशन दुकानाचा परवाना रद्द झाला नसून निविदाही काढण्यात आलेली नाही. त्यामुळे परवाना तातडीने रद्द करून निविदा काढण्यात यावी, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना संजय पवार, अजय पालीवाल, अजय बडोले, होमदास ब्राह्मणकर, यादव कुंभरे, प्रकाश उईके, चेतन दहीकर, गोपाल लाडे, बबन बडवाईक, विजय पशिने, सुरेश ठवरे उपस्थित होते.