जिल्ह्यात 17 इंग्रजी माध्यमांच्या अनधिकृत शाळा

0
13

गोंदियाः- गोंदिया जिल्ह्यात शिक्षणविभागातील अधिकाङ्मांच्या व शाळा संचालकाच्या दरम्यान असलेला साटेलोटमुळे नियमबाह्य पद्धतीने अनेक शाळा व कान्व्हेंट सुरू असल्ङ्माने शासनमान्य अनुदानित शाळासमोर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत.जिल्ह्यात मागील ११ वर्षापासून अनाधिकृतरित्ङ्मा सुरू असलेल्या या बेकायदेशीर शाळा संचालक व शिक्षकावर गुन्हा दाखल करून तेथील विद्याथ्याना शासनमान्य शाळेत समायोजित करावे तसेच या बोगस शाळाचा रेकार्ड शासनाने ताब्ङ्मात घ्यावे या मागणीसाठी गोंदिया जिल्हा भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा महासचिव प्रफुल भालेराव यांनी १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनचा इशारा दिला आहे.शासन पातळीवर अनाधिकृत असलेल्या शाळेच्या संचालकाकडून विविध सवलती मिळवून देण्ङ्माच्या नावावर विद्यार्थी व पालकाकडून वेगवेगळ्या हेड खाली अवाढव्य फी वसूल केली जाते असा ही आरोप भालेराव यानी लावला आहे.२००१ पासून जिल्ह्यात अनाधिकृतरित्ङ्मा सुरू असलेला शाळा व कान्व्हेंटची यादी देण्यात आली आहे.त्यात गुरूकूल कान्वेंट दांडेगाव, नतजिवन कॉन्व्हेट आसोली, सुपरनोव्हा पब्लिक स्कूल श्रीनगर गोंदिया,सावित्रीबाई शिशु मंदीर दासगांव,टिक्वंल स्टार कॉन्व्हेंट दासगाव,टिक्वंल स्टार कॉन्व्हेंट कुडवा गोदिया,महर्षी विद्या मंदीर गोंदिया,शिवाजी एकता कॉन्व्हेंट मुर्री,गोंदिया,सरस्वती शिशु मंदीर किंडगीपार,स्व.नारायण शेन्डे कॉन्व्हेंट बनाथर,एम.एस.पटेल कॉन्व्हेंट गोंदिया,मातोश्री कॉन्व्हेंट छिपीया,साई कॉन्व्हेंट खैरबोडी, गोल्डन पब्लिक स्कुल करटी बुज,विवेक मंदीर स्कुल पुनाटोली,पूना पब्लिक स्कूल कन्हारटोली या शाळा व कॉन्व्हेंटचा समावेश आहे.